धावत्या लोकलमधून तोल जाऊन तरुणाचा मृत्यू, गेटवर उभे राहणे जिवावर बेतले

उपनगरी रेल्वे मार्गावर अपघाती मृत्यूचे सत्र सुरूच असून मुंबई फिरण्यासाठी मित्रासोबत गेलेल्या 17 वर्षीय तरुणाचा धावत्या लोकलमधून तोल जाऊन मृत्यू झाला. मोहम्मद फाजील शफीक अन्सारी असे अपघाती मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. हा तरुण मित्रासोबत लोकलच्या गेटवर उभा होता. दरवाजा पकडलेला हात निसटला आणि तोल जाऊन फाजीलचा दुर्दैवी मृत्यू झाला. कळवा स्थानकादरम्यान ही घटना घडली. … Continue reading धावत्या लोकलमधून तोल जाऊन तरुणाचा मृत्यू, गेटवर उभे राहणे जिवावर बेतले