
मध्य रेल्वेमार्फत दिवाळी आणि छठ उत्सवानिमित्त मंगळवारी 23 विशेष गाडय़ा चालवण्यात येणार आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस / लोकमान्य टिळक टर्मिनस येथून गाडया सुटणार आहेत. या गाडय़ा नागपूर, दानापूर, गोरखपूर, मुजफ्फरपुर, वाराणसी येथे जाणार आहेत. तसेच पुणे, हडपसर, दौंड, कोल्हापूर येथून अनेक गाडय़ा सुटणार आहेत. रेल्वेच्या विशेष गाडय़ांसाठी आरक्षण सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर तसेच संकेतस्थळावर www.irctc.co.in सुरू आहे. गाडीच्या थांब्यांवरील तपशीलवार वेळापत्रकासाठी कृपया http://www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या किंवा NTES App डाउनलोड करा, असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाने दिले आहे.

























































