
जिह्यासाठी ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला असून, जिह्याच्या पश्चिम भागात सह्याद्रीच्या पर्वतराजीत धुवाँधार पाऊस सुरू आहे. धरणक्षेत्रात पाऊस मुसळधार सुरू असल्याने कोयना धरणात आवक मोठय़ा प्रमाणात वाढली असून, पाणीसाठय़ात चोवीस तासांत तब्बल 5.14 टीएमसीने वाढ झाली आहे. अन्य धरणांमधील पाणीसाठाही झपाटय़ाने वाढत चालला आहे. दरम्यान, मुसळधार पावसामुळे महाबळेश्वर तालुक्यात दानवली येथील अंगणवाडीची इमारत पडली, तर पाटण तालुक्यात कारळे येथे घराची भिंत कोसळल्याची घटना घडली.
सातारा जिह्याला उद्या रात्रीपर्यंत रेड अलर्ट जारी करण्यात आला असून, त्यापुढील दोन दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट आहे. जिह्यात सातारा, कराड, पाटणसह सर्वच तालुक्यांमध्ये पर्जन्यवृष्टी सुरू आहे. दुष्काळी तालुक्यांमध्ये पावसाचे प्रमाण अल्प असून, पश्चिम भागात मात्र पावसाची धुवाँधार बॅटिंग सुरू आहे. अनेक भागांत पावसाची संततधार सुरू असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.
जिह्याच्या पश्चिम बाजूला सहय़ाद्री कडय़ांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत असल्याने धरणांमधील पाणीसाठा झपाटय़ाने वाढत आहे.
जीवाची बाजी लावून वीजपुरवठा केला सुरू
पाटण तालुक्यातील रासाटी शाखेअंतर्गत येणाऱया देकघर येथे अतिकृष्टीमुळे विजेचे पोल पडल्यामुळे दुर्गम भागातील गोकारे, तलोशी, काघणे, नाक, चिरंबे अशी 5 गाके अंधारात गेली होती. ही बाब स्थानिक पोलीस पाटील क ग्रामस्थ यांनी तहसीलदार क प्रांताधिकारी पाटण यांच्या निदर्शनास आणून दिली. कीज कितरण किभागाचे उपअभियंता कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली शाखा अभियंता मंगेश क्षीरसागर, कायरमन आकाश कुंभार, अमित सपकाळ यांनी तत्काळ जीकाची बाजी लावून पाऊस सुरू असतानादेखील तलाकात पोहत जाऊन किद्युत तारा ओढून वीजपुरकठा सुरळीत केला.
घराची भिंत कोसळली
पाटण तालुक्यातील कोयनानगर परिसरात दोन-तीन दिवसांपासून पाकसाची संततधार सुरू असल्यामुळे अनेक ठिकाणी नदी-नाल्यांच्या पाणीपातळीत काढ झाली आहे. काही ठिकाणी पुलाकरून पाणी जात आहे, तर काही ठिकाणी रस्त्याकर झाडे पडल्याच्यादेखील घटना घडत आहेत. संततधार पावसामुळे कारळे येथील कोंडिबा बंडू साळुंखे यांच्या घराची भिंत पाकसामुळे पडली. अशा संकटांच्या अनुषंगाने पाटण प्रशासन रात्रंदिकस अलर्ट असून, तत्काळ उपाययोजनादेखील करण्यात येत आहेत.