
देवनार, मानखुर्द परिसरातील नशेबाजांना बटण म्हणजेच नायट्राझेपम आणि क्लोनाझेपन गोळयांची विक्री करणाऱ्या एका ड्रग्ज तस्कराच्या गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून हजारो रुपये किमतीच्या या गोळ्या, रोकड व मोबाईल असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आले.
गुन्हे शाखा युनिट 6 चे प्रभारी निरीक्षक भारत घोणे तसेच स.पो.नि. गावडे, चिकणे, उपनिरीक्षक रहाणे व पथक देवनार, शिवाजीनगर परिसरात गस्त घालत असताना देवनारच्या नवीन गौतम नगर परिसरात राहणारा फुरकान अन्सारी (26) हा नशेबाजांना बेकायदेशीरपणे नायट्राझेपम आणि क्लोनाज्ञोपन गोळ्यांची विक्री करत असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार या पथकाने शोध घेऊन फुरकान वाला पकडले. त्याच्याकडून हजारो रुपये किमतीच्या नायट्राोपम आणि क्लोनाक्षोपन गोळ्यांचा साठा, 54 हजारांची रोकड व नशेबाजांना संपर्क साधण्यासाठी वापरत असलेला मोबाईल असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. फुरकानकडून जवळपास 1910 गोळ्या हस्तगत करण्यात आल्या.
एक्सप्रेसमध्ये स्फोटक ठेवल्याच्या अफवेचा फोन
अमृतसर एक्सप्रेसमध्ये स्फोटक ठेवल्याच्या कॉलने एकच खळबळ उडाली होती. त्या कॉलनंतर बॉम्बशोधक व नाशक पथकाने एक्सप्रेसची तपासणी केली, तेव्हा ती अफवा असल्याचे समोर आले. या प्रकरणी डोंगरी पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.
शहरात गेल्या काही दिवसांपासून अफवेच्या फोनचे प्रकार वाढत चालले आहेत. मंगळवारी रात्री रेल्वे लोहमार्ग पोलिसांच्या नियंत्रण कक्षात एका नंबरवरून फोन आला. फोन करणाऱ्याने त्याची ओळख सांगितली. अमृतसर एक्सप्रेसमधील लगेज। डब्यात पांढऱ्या रंगाच्या दोन गोणी आहेत. त्या गोणीचे वर्णन सांगून त्यात स्फोटक असल्याचे सांगून त्याने फोन बंद केला. याची माहिती रेल्वे पोलीस नियंत्रण कक्षाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर बॉम्बशोधक व नाशक पथकांचे श्वान घटनास्थळी आले. त्या डब्यात तपासणी केली.
24 कोटीचे एमडी ड्रग जप्त
महसूल गुप्तवार्ता संचलनालयाने (डीआरआय) मुंबईत कारवाई करून 24 कोटी रुपयांचे एमडी ड्रग जप्त केले आहे. या प्रकरणी पाच जणांना डीआरआयने अटक केली. ते ड्रग हैदराबाद येथून मुंबईत आणण्यात आले होते. शहरात अमली पदार्थ तस्करीचे प्रकार होऊ नयेत याची खबरदारी संबंधित यंत्रणांनी घेतली आहे. हैदराबाद येथून बसने दोन प्रवाशी हे एमडी ड्रग घेऊन येत असल्याची माहिती डीआरआय मुंबई युनिटला मिळाली. त्या माहितीची सत्यता पडताळली. तपासासाठी पथक तयार केले. मंगळवारी डीआरआयच्या पथकाने रात्रभर एका बसवर पाळत ठेवली. बसमधून संशयित दोन जण बाहेर पडले. त्या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील बॅगेची तपासणी केली. त्यांच्या बंगत वृत्त एमडी ड्रग होते. त्या दोघांकडून 16 किलो एमडी ड्रग जप्त केले. डीआरआयच्या पथकाने त्याची कसून चौकशी केली. त्याच्या चौकशीत आणखी तिघांची नावे समोर आली. आरोपीना मध्यस्थ व त्याचा साथीदार हे मुंबईत भेटणार होते अशी माहिती तपासात समोर आली आहे.