
राजकारणात कोणत्याही प्रकारच्या टीका होतील, गरज नसताना प्रशंसा होईल, परंतु तुम्ही राजकारणात असल्याने या सगळ्या गोष्टींसाठी नेहमीच तयार राहिले पाहिजे. महाराष्ट्रात तर असे म्हटले जाते की राजकारणात गेंड्याची कातडी हवी, अशी मार्मिक टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बी. आर. गवई यांनी महाराष्ट्रातील राजकारणात सुरू असलेल्या घडामोडींना धरून केली. केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल. मुरुगन यांनी चेन्नईतील ट्रस्टवर केलेल्या आरोपांप्रकरणी त्यांच्याविरोधात दाखल मानहानीच्या खटल्यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे.
डिसेंबर 2020 मध्ये एका पत्रकार परिषदेत मुरुगन यांनी चेन्नईच्या मुरसोली ट्रस्टवर आरोप केला होता की, मुरसोली ट्रस्ट तामीळनाडूतील दलितांसाठी असलेल्या जमिनीवर चालत आहे. मुरुगन यांनी मद्रास उच्च न्यायालयाचा 5 सप्टेंबर 2023 चा खटला रद्द न करण्याच्या आदेशाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती.