चक्क एक गावच वसवले;अबब…12 बायका 102 मुले!

सध्या लोकसंख्येच्या बाबतीत हिंदुस्थान आणि चीन तुफान चर्चेत आहे.हिंदुस्थानने चीनला याबाबतही मागे सोडले आहे. लोकसंख्या कमी करण्यासाठी विविध देशांत वेगवेगळे उपक्रमही राबवले जात आहेत. परंतु नायजेरियातील एका व्यक्तीने तोंडात बोटे घालाल असा कारनामा केला आहे. या व्यक्तीला 10 किंवा 15 नाहीत, तर तब्बल 102 मुले आहेत. त्यांची संख्या इतकी असल्याने तो त्यांची नावेही विसरतो. त्यामुळे त्याने चक्क एक नोंदवहीच केली आहे. त्यात त्याने सर्व मुलांची नावे लिहिली आहेत. या व्यक्तीने 12 लग्ने केली आहेत. मुसा यांनी चक्क एक गावच वसवले असून त्यांची 20 ते 30 घरे आहेत.

सतराव्या वर्षी पहिले लग्न

मुसा कसेरा यांच्या प्रत्येक पत्नीने कमीत कमी 8 ते 9 मुलांना जन्म दिला आहे. एका मीडिया रिपोर्टनुसार जेव्हा मुलांची संख्या रोखणे अवघड झाले तेव्हा त्यांनी पत्नींना गर्भनिरोधक गोळ्या दिल्या. मुसाचे पहिले लग्न 1972 मध्ये झाले होते. तेव्हा ते केवळ 17 वर्षांचे होते. त्यानंतर त्यांनी एकापाठोपाठ 12 महिलांशी लग्न केले.