नववर्षाच्या स्वागतासाठी दापोली मुरुडला पर्यटकांची पसंती; सुमद्रकिनारे गर्दीने फुलले

दापोली तालुक्यातील मुरूड हे पर्यटकांचे आकर्षण आहे. सलग लागलेल्या सुट्ट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटकांची पावले दापोली मुरुडकडे वळत आहेत. 2024 या सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि 2025 या नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी मुरुड येथे शनिवार पासुनच मोठ्या प्रमाणात पर्यटक येण्यास सुरुवात झाली आहे.

मुरुड येथील बहुतेक हाॅटेल , रिसॉर्ट , घरगुती खानावळी , एम. टी. डी. सी. मान्यता प्राप्त न्याहारी आणि निवासाच्या सोयी हाऊस फुल्ल झालेल्या आहेत. थर्टी फस्टच्या आधीच दोन दिवस मुरुड येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक आल्याने पोलीस प्रशासनावर मोठा ताण पडला आहे. आसुद आणि सालदुरे तसेच कर्दे मार्गे मुरुड येथील समुद्र किनाऱ्यावर जाण्यासाठीच्या रस्त्यांवर वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या आहेत. कोणत्याही अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.