
बॉलीवूड अभिनेता वरुण धवन सध्या आगामी चित्रपट ‘बॉर्डर-2’वरून चर्चेत आहे. या चित्रपटात वरुण मेजर होशियार सिंह दहियाची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाचा टीझर आणि पहिले गाणे ‘घर कब आओगे’ प्रदर्शित झाले आहे, परंतु या गाण्यावरून सोशल मीडियावर वरुण धवनला नेटिजन्सकडून चांगलेच ट्रोल केले जात आहे. वरुणचा अभिनय आहे तसाच आहे, त्यात सुधारणा करण्याची गरज आहे, चांगल्या गाण्याची वरुणने वाट लावली, आधीच्या चित्रपटातील गाणे चांगले होते. आता मात्र गाणे चांगले दिसत नाही, अशा वेगवेगळय़ा नकारात्मक कमेंट युजर्सकडून केल्या जात आहेत. अनेक युजर्संनी तर वरुण धवनची मिमिक्रीसुद्धा केली आहे, तर काही युजर्संनी वरुणच्या भूमिकेचे आणि गाण्याचे कौतुक केले आहे. निगेटिव्ह कमेंट करून ट्रोल करणाऱयांना वरुण धवन आणि चित्रपट निर्मात्या निधी दत्ताने चांगलेच सुनावले आहे.






























































