
महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा शहरात मोठा धुराळा उडत आहे. मतदानासाठी आता काही दिवस उरले असून प्रशासनानेही सुरक्षेच्या दृष्टीकोनातून तयारी केली आहे. संवेदनशील मतदान केंद्रांचा आढावा घेतल्यानंतर प्रशासनाने 64 मतदान केंद्रांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतला आहे.
अकोल्यात 20 प्रभाग असून त्यासाठी 469 उमेदवार रिंगणात आहेत. त्यापैकी 367 उमेदवार हे विविध राजकीय पक्षांचे आहेत. उमेदवारांनी प्रचारात स्वतःला झोकून दिले आहे. मतदान प्रक्रिया शांतेत आणि पारदर्शक असावी, यासठी प्रशासनाकडून मतदान केंद्रांची पाहणी, कर्मचायांच्या नियुक्त्या तसेच सुरक्षा व्यवस्थेचे नियोजन करण्यात आले आहे. शहरात 64 मतदान केंद्र संवेदनशील जाहीर करण्यात आले असून या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येतील. तसेच पोलीस बंदोबस्तदेखील वाढवण्यात येणार आहे.

























































