
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची नजर सध्या ग्रीनलॅंडवर आहे. मंगळवारीच त्यांनी ‘ट्रूथ सोशल’ या अकाऊंटवर अमेरिकेचा नवा नकाशा शेअर केला. त्यात ग्रीनलँडसह व्हेनेझुएला व कॅनडाला अमेरिकेचा भाग म्हणून दाखवण्यात आले आहे. कोणत्याही भागावर आपला दावा सांगणे हा अमेरिकेचा 200 वर्षे पूर्वीपासूनचा इतिहास आहे. मग ती जमीन विकत घेऊन असो वा त्यावर मालकी हक्क सांगणे असो. 1803 पासून आत्तापर्यंत अमेरिकेने तब्बल 8 प्रदेश बळकावले आहेत. म्हणजे प्रत्येक 30 वर्षींनी अमेरिका 1 प्रदेश आपल्या नावे करते.
गेल्या 200 वर्षांत अमेरिकेने मिळवलेल्या प्रदेशांची माहिती पुढीलप्रमाणे-
1803 – लुइसियाना
लुइसियाना विकत घेतल्यानंतर खरं तर अमेरिकेचा मोठा विस्तार झाला. अमेरिकेने फ्रान्सकडून 53 दशलक्ष एकर जमीन 15 दशलक्ष डॉलर्समध्ये विकत घेतली. त्या वेळी, फ्रान्सचे सम्राट नेपोलियनला कॅरिबियनमधील पराभव आणि ब्रिटनसोबत होणाऱ्या युद्धाचा धोका होता या भीतीने त्याने हा प्रदेश विकला. या व्यवहारामुळे अमेरिकेचा आकार जवळजवळ दुप्पट झाला.
1819 – फ्लोरिडा
फ्लोरिडा प्रदेश पूर्वी स्पेनच्या मालकीचा होता. 1783 मध्ये ब्रिटनने पूर्व आणि पश्चिम फ्लोरिडा स्पेनला सोपवले. यानंतर 1810 मध्ये निदर्शने सुरू झाली आणि अमेरिकेचे चौथे अध्यक्ष जेम्स मॅडिसन यांनी याचा फायदा घेतला. 1803 च्या लुईझियाना खरेदी अंतर्गत हा प्रदेश अमेरिकेचा आहे. 1818 मध्ये जनरल अँड्र्यू जॅक्सनने फ्लोरिडातील स्पॅनिश बंदरे ताब्यात घेतली. अमेरिकन लष्करी कारवाई आणि राजकीय दबावामुळे स्पेनने ओनिस-अॅडम्स करारानुसार फ्लोरिडा अमेरिकेला सोपवले.
1845- टेक्सासचे विलयीकरण
मेक्सिकोपासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1836 मध्येच टेक्सासने अमेरिकेत सामील होण्याची इच्छा व्यक्त केली. टेक्सासनेही विलिनीकरणाच्या बाजूने मतदान केले. मात्र टेक्सास आणि अमेरिका यांच्यातील कोणत्याही विलिनीकरण कराराला दोन्ही सरकारांनी मान्यता दिली नाही. 1845 मध्ये, अमेरिकन काँग्रेसने औपचारिकपणे टेक्सासला विलिनीकरण करण्याचा संयुक्त ठराव मंजूर केला.
1854—गॅडस्डेन खरेदी
गॅडस्डेन खरेदी अंतर्गत, अमेरिकेने मेक्सिकोकडून 29,670 चौरस मैल जमीन 10 दशलक्ष डॉलर्सना खरेदी केली. ही जमीन आता अॅरिझोना आणि न्यू मेक्सिकोचा भाग आहे आणि ती दक्षिण रेल्वेसाठी वापरली जात होती.
1867- अलास्काची खरेदी:
रशियाकडून ७.२ दशलक्ष डॉलर्सना अलास्काची खरेदी करण्यात आली होती. कमी लोकसंख्या, आर्थिक समस्या आणि क्रिमियन युद्धातील पराभवामुळे रशियाला अलास्का विकावे लागले. सुरुवातीला जगभरात या खरेदीची थट्टा केली जात होती, मात्र दुसऱ्या महायुद्धात सोन्याचा शोध आणि त्याच्या धोरणात्मक महत्त्वांमुळे हा करार फायदेशीर ठरला. 1959 मध्ये अलास्का एक राज्य बनले.
1917 – यूएस व्हर्जिन आयर्लंडची खरेदी:
अमेरिकेने यूएस व्हर्जिन आयर्लंड डेन्मार्ककडून 25 दशलक्ष डॉलर्सना खरेदी केले. पहिल्या महायुद्धात कॅरिबियन सुरक्षित करण्यासाठी आणि पनामा कालव्याचे जर्मनीपासून संरक्षण करण्यासाठी हा करार करण्यात आला.
1959- हवाईवर नियंत्रण
1893 मध्ये अमेरिकन समर्थक आणि मरीनने हवाईच्या राणी लिलिउओकलानीला पदवरून पायउतार केले केले आणि राजेशाही संपुष्टात आणली.1898 मध्ये काँग्रेसने विलिनीकरणाचा ठराव मंजूर केला. 21 ऑगस्ट 1959 रोजी हवाई 50 वे राज्य बनले.


























































