
मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटनेतेपदी माजी महापौर आणि नगरसेविका किशोरी पेडणेकर यांची निवड करण्यात आली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत वॉर्ड क्रमांक 199 मधून शिंदे गटाच्या रुपल कुसळे यांचा पराभव करून किशोरी पेडणेकर विजयी झाल्या होत्या. शिवसेना भवनात बुधवारी झालेल्या बैठकीत किशोरी पेडणेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
मुंबई महापालिकेत शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटनेतेपदी किशोरी पेडणेकर यांची निवड करण्यात आली आहे. pic.twitter.com/6SGbaB17PG
— Saamana Online (@SaamanaOnline) January 21, 2026
गटनेतेपद जाहीर झाल्यानंतर किशोरी पेडणेकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. गटनेता ही फार महत्त्वाची जबाबदारी असते. या महत्त्वाच्या जबाबदारीसोबत यापूर्वी गटनेतेपद सांभाळलेल्या विशाखाताई आणि नवीन नगरसेवक हे सगळे माझ्या सोबत आहेत. याशिवाय अनिल परब, संजय राऊत, अनिल देसाई, विनायक राऊत यासगळ्या ज्येष्ठ नेत्यांचे मला मार्गदर्शन आहे. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनी जी जबाबदारी मला दिली आहे, ती आम्ही समर्थपणे पार पाडू, असे यावेळी किशोरी पेडणेकर म्हणाल्या.




























































