Aero show Photo – तेजोमय गगन! नाशिककरांनी अनुभवला सूर्यकिरण टीमच्या हवाई कसरतींचा थरार

आशिया खंडातील सर्वोत्तम हिंदुस्थानी वायू दलाच्या सूर्यकिरण टीमने नाशिक येथील गंगापूर धरण परिसरात गुरुवारी नऊ लढाऊ विमानांच्या शानदार हवाई कसरती करून उपस्थितांना थक्क केले. वायूवेगाने झेपावून तिरंगा, मिग २९, बाण, त्रिशूळ, डीएनएसह विविध प्रतिकृती साकारून आकाशाला त्यांनी जणू नक्षीदार साज चढवला. या सुमारे पंचवीस मिनिटांच्या चित्तथरारक कसरतींमधून वैमानिकांनी शौर्याचे दर्शन घडवून हजारो नाशिककरांमध्ये देशभक्तिचा जागर केला.

सर्व फोटो: भूषण पाटील, नाशिक