
गद्दारी जर का आजपर्यंत भगव्याशी झाली नसती तर अतिशयोक्ती वाटेल पण या महाराष्ट्राने जगाचा इतिहास बदलून दाखवला असता, असे म्हणत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र धर्माचा जागर करत तडाखेबंद भाषण केले. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला.
आजपासून शिवसेनाप्रमुखांच जन्मशताब्दी वर्ष सुरू होत आहे. १९२७ हे त्यांचं जन्मवर्षे म्हणजे पुढच्या वर्षी १०० वर्षे पूर्ण होणार. आजपासून त्या जन्मशताब्दी वर्षाला सुरुवात झाली आहे. या सगळ्या काळामध्ये अनेक चढउतार आपण सर्वांनी पाहिले, अनुभवले. राज आला, आमचं बालपण एकत्र गेलं. एक गोष्ट खरी आहे की, आम्ही वादळामध्ये खेळत मोठी झालेली मुलं आहोत. त्याच्यामुळे वादळाशी कसं लढायचं हे आम्हाला कोणी शिकवण्याची गरज नाही. पण वादळाशी जसं लढायचं असतं तसं वादळाची जबाबदारी खांद्यावर पेलणं किती कठीण असतं, हे ज्याच्या खांद्यावरती जबाबदारी आहे ते त्यालाच कळू शकतं, असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
शिवसेनाप्रमुख, हिंदुहृदयसम्राट हे जगासाठी. साहजिकच माझी ओळख माझे वडील म्हणून त्यांच्याशी पहिलांदा झाली. माँ आणि साहेब. अर्थात साहेबांना चारचौघात आम्ही साहेब म्हणायचो. आमचे वडील आणि मुलाचं नातं आणि ते नाव एक वेगळं होतं. माझे आजोबा म्हणजे साक्षात जमदग्नीचे अवतातर. असे आजोबा आणि असे वडील आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाशी एकदम विरुद्ध आमची माँ. या सगळ्या वाटचालीत माँचं योगदान फार मोठं आहे. म्हणजे समईची वात शांतपणाने जळत आजूबाजूचा परिसर उजळून टाकते. पण तिच्यातली ती आग ती स्वतः सहन करत असते, तशी माझी माँ, ही शांतपणाने संपूर्ण घर सांभाळत होती. आम्ही तिनही मुलं, आम्हाला कुठेही बाहेर काय चाललंय? याची जाणीव होऊ न देता आई म्हणून तिची एक वेगळी भूमिका ती पार पाडत होती. त्याचवेळेला शिवसेनाप्रमुखांसारखा पती त्याचं घर सांभाळणं, प्रबोधनकारांची सून म्हणून त्यांना सांभाळणं हे सगळं होत गेलं काहीळत नाही. घरामध्ये आजोबा आणि वडील आणि आम्ही मुलं आणि नातवंडं असं ते नातं होतं. शाळेला दांडी मारायची असली तर मी माँचा आधार नाही घ्यायचो जाऊन बाळासाहेबांना घट्ट मिठी मारायचो. आणि मग त्यांच्या लक्षात यायचं, माँ आली की म्हणायचे, जाऊ दे गं एक दिवस शाळेत नाही गेला तर काय होतं. अर्थात त्यांच्यासाठी ते बरोबर होतं. कारण त्यांना स्वतःला आणि माझ्या आजोबांना सुद्धा परिस्थिनुसार सातवीमध्ये शाळा सोडावी लागली होती. पण त्यानी एवढं जे काही कर्तृत्व उभं केलंय की ते ठाकरे नाव पुसायला अनेकजण इकडे उतरतायेत पण अजून ते नावचं पुसलं जात नाहीये. असं काय ते रसायन होतं आणि त्यांचे आम्ही वारसदार. या परंपरेचा मला अभिमान आहे आणि माझं भाग्य आहे. आणि जे विरोधक आहेत त्यांना त्यांच्या वडिलांचं नाव घ्यायला लाज वाटते त्याला मी काही करू शकत नाही, असा जोरदार टोला लगावत उद्धव ठाकरे यांनी आठवणींना उजाळा दिला.
जेव्हा आपण महाराष्ट्राचा, महाराष्ट्र धर्माचा विचार करतो तेव्हा इतिहास बघितला तर शिवाजी महाराज आणि त्यांच्याही अधीचा आपण बघितलं तर गद्दारी हा काही विषय नाही आजचा नाही, गद्दारी हा विषय पूर्वापार चालत आलेला, तो आपल्याला एक शापच लागलेला आहे. आणि जर का असा विचार केला की, जेव्हा विजय अशक्य असतो तेव्हा आपला शत्रू गद्दारांची मदत घेत असतो. आणि गद्दारी जर का आजपर्यंत भगव्याशी झाली नसती तर अतिशयोक्ती वाटेल पण या महाराष्ट्राने जगाचा इतिहास बदलून दाखवला असता. शिवसेना यावर्षी ६० वर्षांची होईल. ६० वर्षांचं झाड सुद्धा फार मोठं असतं. कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ, असे सगळे कुऱ्हाडीचे दांडे आपलेच दांडे आपल्या मुळावरती घाव घालण्यासाठी दोन व्यापारी वापरतायेत, असा हल्ला उद्धव ठाकरे यांनी चढवला.
मुंबईची लढाई तुम्ही चांगली लढलात. देशभरातून प्रतिक्रिया येत आहेत की, ही लढाई तुम्ही फार उत्तमपद्धतीने लढलात. जो एक आभास किंवा एक चित्र निर्माण केलं होतं की शिवसेना संपल. ठाकरे नाव पुसून टाकणार. त्यांना तुम्ही रोखलतं आणि हे फक्त महाराष्ट्र करू शकतो. यांना ठाकरे म्हणजे ते झाड का तोडायाचं आहे? कारण तोपर्यंत त्यांची खाण होत नाहीये. संपूर्ण महाराष्ट्र यांना पादाक्रांत वेगळ्या पद्धतीने करायचा आहे, महाराष्ट्र गिळायचा आहे. या वेळेला पहिल्या प्रथम मुंबईमध्ये सुद्धा पैशाचा वापर केला गेला. अनेक ठिकाणी तक्रारी आल्या. दार बंद असलं तर दाराच्या खालच्या फटीतून पैसे भरलेले लिफाफे आतमध्ये फेकले गेले. विकत घेताय तुम्ही महाराष्ट्र? मत विकत घ्याल पण मन कसं विकत घ्याल? आणि जी जिवंत मनं आहेत ती आज सुद्धा माझ्या भगव्यासोबत, शिवसेनाप्रमुखांच्या शिवसेनेसोबत आहेत, हे परत तुम्ही दाखवून दिलेलं आहे. हीच आपली ताकद आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
कोण आहोत आम्ही? ठाकरे म्हणजे कोण आहोत? पुसून टाका नाव ठाकरे, बघा आयुष्यात काय होतंय? शिवसेना काढून टाका. आयुष्यातून शिवसेना पुसून टाका, ठाकरे नाव पुसून टाका आणि मग मुंबई आणि महाराष्ट्राचा विचार करा. काय होतंय काय शिल्लक राहतंय, हा विचार करा. आणि हे गधडे बोलतात, शिवसेनेने मराठी माणसाला काय दिलं, शिवसेनेने मुंबईला काय दिलं, शिवसेनेने महाराष्ट्रा काय दिलं? बाळासाहेबांनी मराठी माणसाला जगायचं कसं हे पहिले शिवकवलं. जगाचं कसं हेच आपण विसरून गेलो तर जसं पूर्वी गुलामगिरीमध्ये आपण राहत होतो तसं या दोन व्यापाऱ्यांचे गुलाम म्हणून आपल्या नशिबी जीणं येईल. गुलामीचं जीणं कदापी जगणं मी शक्य नाही. मेलो तरी बेहत्तर पण त्या दोन व्यापाऱ्यांचं गुलाम बनून मी आयुष्यात कधी जणार नाही, ही शपथ सगळ्यांनी घेतली पाहिजे, असे उद्धव ठाकेर म्हणाले.
किती कराल वार, आम्ही काय लढाईला घाबरणारी माणसं नाहीत. मराठ्यांचा इतिहास जेवढा रक्तरंजित आहे कदाचित तेवढा रक्तरंजित इतिहास आपल्या देशातच नव्हे तर जगाच्या पाठीवर दुसऱ्या कोणाचा असेल. पण त्या रक्तरंजित इतिहासामध्ये पाठीवरचे वार हे जास्त करून गद्दारांनी केलेल आहेत, याचं जास्त शल्य आणि जास्त दुःख आहे. मुंबईवरचा शिवरायांचा भगवा तुम्ही उतरवलात, काय मिळवलत काय? काय महापौरपद? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.




























































