
सलग दोन दिवसांच्या तेजीनंतर आज सोन्या-चांदीच्या बाजारात घसरण झाली आहे. वायदा बाजारात (एमएलएक्स) चांदीच्या दरात 30 हजार 230 रुपयांनी घट झाली. चांदीचा भाव प्रतिकिलो अडीच लाखांच्या आसपास राहिली. सोन्याचे दरही प्रतितोळा सुमारे 3617 रुपयांनी कमी झाले. सोने प्रतितोळा दीड लाखाच्या वर गेले.
यापूर्वी 29 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान चांदीची किंमत 1.60 लाख रुपयांनी कमी झाली होती, तर सोन्याच्या किमतीत 26 हजार रुपयांची घट झाली होती. त्यानंतर मौल्यवान धातूंच्या किमतीत चढउतार दिसून आला.
आजचा जीएसटीशिवायचा सोन्याचा दर 153012 रुपये प्रतितोळा आहे. तर चांदीचा दर 252232 रुपये किलो आहे. जीएसटीसह सोन्याचा दर 157602 रुपये आणि चांदीचा दर 259798 रुपये आहे.
24 कॅरेट सोन्याप्रमाणे 22
कॅरेट सोन्याच्या दरातदेखील 3310 रुपयांची घसरण होऊन एक तोळ्याचा दर 140159 रुपये झाला आहे. जीएसटीसह 22 तोळे सोन्याचा दर 144363 रुपये आहे.
सोने-चांदीच्या किमती अलीकडच्या काळात विक्रमी पातळीवर पोहोचल्या होत्या, त्यानंतर गुंतवणूकदारांनी मोठय़ा प्रमाणावर नफा घेतला. सर्वकालीन उच्चांकानंतर प्रत्यक्ष मागणी कमी झाली. गुंतवणूकदारांनी विक्रीला सुरुवात केली.


























































