
बॉलीवूडचा सुप्रसिद्ध अभिनेता आमिर खानच्या प्रॉडक्शनची निर्मिती असलेल्या ‘एक दिन’ या चित्रपटाची गेल्याकाही दिवसांपासून चर्चा आहे. अखेर या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटात आमिर खानचा मुलगा जुनैद खान मुख्य भूमिकेत असणार आहे. यातील मुख्य आकर्षण म्हणजे, त्याच्यासोबत दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री साई पल्लवीही दिसणार आहे.
या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला. या ट्रेलरमध्ये जुनैद आणि साई पल्लवीची केमिस्ट्री फ्रेश आणि मनमोहक दिसत असून, सोशल मीडियावर चाहत्यांनी या जोडीला पसंती दर्शवली आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमुळे चाहत्यांमध्ये चित्रपटाबद्दल मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
View this post on Instagram
‘Ek Din’ या चित्रपटातून साई पल्लवी बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये जुनैद खान (रोहन) आणि साई पल्लवी (मीरा) यांच्यातील केमिस्ट्री प्रेक्षकांचं मन जिंकत आहे. साई पल्लवीचा साधेपणा आणि तिचा बॉलिवूड डेब्यू प्रेक्षकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. चित्रपटाच्या कथेसोबतच त्यातील संगीतानेही प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. प्रसिद्ध गायक अरिजीत सिंहचा आवाज आणि राम संपत यांच्या संगीतामुळे या चित्रपटाला चार चांद लागले आहेत. इरशाद कामिल यांच्या गीतांनी या चित्रपटातील प्रेम कथेला एक वेगळीच अनुभूती दिली असून, ट्रेलरमधील चित्रपट आणि गाणी दोन्ही सुपरहिट होणार आहे.
या बहुप्रतिक्षित चित्रपटाची रिलीज डेटही जाहीर करण्यात आली असून, ‘एक दिन’ येत्या 1 मे 2026 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन सुनील पांडे यांनी केले आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने आमिर खान आणि मन्सूर खान अनेक वर्षांनंतर एकत्र आले आहेत. तर स्नेहा देसाई आणि स्पंदना मिश्रा यांनी चित्रपटाची कथा लिहिली असून, जुनैद खानसाठी हे पदार्पण खूप महत्त्वाचे मानले जात आहे. चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी वापरलेले लोकेशन्स, याचे सुंदर संगीत आणि प्रभावी व्यक्तिरेखा यामुळे प्रेक्षक आता चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.





























































