एशियाटिक सोसायटीच्या निवडणुकीला पुन्हा स्थगिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कला-संस्कृती, इतिहास संशोधनात दोन शतकांहून अधिक काळ कार्यरत असलेल्या दि एशियाटिक सोसायटीच्या शनिवार 14 मार्च रोजी होणाऱया बहुचर्चित निवडणुकीला मतदार याद्यांमधील गोंधळामुळे धर्मादाय आयुक्तांनी स्थगिती दिली. धर्मादाय आयुक्तांनी निरीक्षक नेमला असून मतदारयाद्यांची पुन्हा छाननी केली जाणार आहे. त्यानंतर निवडणूक प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.

एशियाटिकची निवडणूक स्थगित होण्याची ही दुसरी वेळ आहे. धर्मादाय आयुक्तांनी आज दिलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार निवडून आलेली व्यवस्थापन समिती स्थापन होईपर्यंत एशियाटिक सोसायटीचा कारभार निरीक्षक के.डी. तलोकर, व्यवस्थापन समितीचे मंदार भारदे, विवेक गणपुले, कुमार केतकर, सुरेंद्र कुलकर्णी, सूरज पंडित यांच्या समितीद्वारे चालविला जाणार आहे. कुमार केतकर, विवेक गणपुले हे उमेदवार असल्याने त्यांना मतदार यादी तयार करण्याचे काम करता येणार नाही. ही समिती दोन महिन्यांत पात्र मतदारांची यादी तयार करेल. त्यावरील हरकतींची 15 दिवसांत सुनावणी घेऊन वैध मतदार याद्या तयार करण्यात येतील, असे धर्मदाय आयुक्त यांनी निकालपत्रामध्ये दिला.