
उन्हाळ्यात उष्णतेचा त्रास होतो. म्हणजेच उष्माघात. काही वेळेला गंभीर वैद्यकीय संकट येऊ शकते. तहान लागण्याची वाट पाहू नका. दर तासाला थोडे थोडे पाणी प्या. नैसर्गिक पेये लिंबू-कोकम सरबत शहाळे ताक प्या.
कलिंगड, संत्री, काकडीसारखी फळे भाज्या खा. कच्चा कांदा खाणे म्हणजे उष्माघातावर रामबाण उपाय. घराबाहेर पडतान सैल कपडे घाला. डोळ्यांसाठी सनग्लासेस आवश्यक. खिडक्या खुल्या ठेवा. कुलर फॅनचा वापर करा.
























































