महिलेचे लचके तोडत कुत्र्यांनी घेतला जीव, चाकणमधील थरार; झुंडीने केला हल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

औद्योगिक शहर असलेल्या चाकणमध्ये भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात एका 32 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. पुणे–नाशिक महामार्गावरील आंबेठाण चौकाजवळ मध्यरात्रीच्या सुमारास दहा ते बारा भटक्या कुत्र्यांच्या झुंडीने महिलेवर हल्ला चतिचे अक्षरशः लचके तोडले. त्यामुळे ती मरण पावली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

शोभा विजय वाघमारे (वय 32) असे मृत महिलेचे नाव असून त्या मूळच्या नांदेड जिह्यातील देगलूर येथील रहिवाशी होत्या. सध्या त्या चाकण परिसरात वास्तव्यास होत्या. सोमवारी (दि. 16) मध्यरात्री त्या आंबेठाण चौकाजवळील उड्डाणपुलाखालून सर्व्हिस रोडने जात असताना अचानक भटक्या कुत्र्यांच्या झुंडीने त्यांच्यावर हल्ला केला.

दहा ते बारा कुत्र्यांच्या टोळीने एकाच वेळी हल्ला केल्याने त्या पूर्णपणे घेरल्या गेल्या. जीव वाचवण्यासाठी त्यांनी दगड उचलून प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र कुत्र्यांच्या त्या आक्रमक झुंडीपुत्यांचा निभाव लागला नाही. हा संपूर्ण प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱयात कैद झाला आहे.