
राज्यातील नऊ मंत्री या भोंदूबाबा खरातचे निस्सीम भक्त होते. हे मंत्री नियमित भोंदूबाबाकडे जाऊन अत्यंत घृणास्पद प्रकारचे विधी करत होते. ही केवळ अंधश्रद्धा नसून, महाराष्ट्राच्या प्रतिमेला कलंकित करणारे हे प्रकरण आहे. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केली आहे. खरातच्या मोबाईलमध्ये सापडलेल्या आक्षेपार्ह क्लिपमुळे काही मंत्री इतके तणावात आहेत की त्यांना आयसीयूमध्ये भरती करावे- लागेल, असा टोला संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना लगावला.
सोमवती अमावास्येला बोट कापले; अंधारे यांचा आरोप
पॅप्टन अशोक खरात आणि रूपाली चाकणकर यांचे घनिष्ठ संबंध आहेत. त्याच्या नादी लागून चाकणकर यादेखील तंत्र-मंत्र-विद्या आणि काळ्या जादूचा वापर करत होत्या. ग्रहांचे आशीर्वाद मिळावेत, यासाठी त्यांनी सोमवती अमावास्येला स्वतःचे बोट कापून घेतले, असे आरोप शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केले.





























































