अर्नाळा-छत्रपती संभाजीनगर बसला नाशिकमध्ये अपघात; 12 जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

येवला-नाशिक महामार्गावरील मुखेड फाटा येथे गुरुवारी दुपारी एसटी आणि ‘हिरकणी’ बस यांच्यात समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात बारा प्रवासी जखमी झाले असून अपघातात दोन्ही बसच्या दर्शनी भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे.  गुरुवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास तालुक्यातही मुखेड फाटा येथे अर्नाळा आगाराची बस अर्नाळाहून छत्रपती संभाजीनगर तर छत्रपती संभाजीनगर आगाराची बस येवल्याहून नाशिककडे येत असताना हा अपघात घडला. जखमींना शहरातील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. जखमी रुग्णांना आणल्यानंतर रुग्णालयातील वीजपुरवठा खंडित झालेला होता. आपत्कालीन परिस्थितीत पर्यायी व्यवस्था म्हणून जनरेटरची सोय नसल्याने नागरिकांनी तीव्र संताप व खेद व्यक्त केला.