
अचलपूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार बच्चू कडू यांच्यावर हत्येचा कट रचल्याचा आरोप करण्यात आला आहे. विद्यमान आमदार प्रवीण तायडे यांच्या चुलत भाऊ अभिजित तायडे यांना संपवल्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपातून चांदूरबाजार पोलीस ठाण्यात बच्चू कडू यांच्यासह त्यांच्या दोन सहकाऱयांविरोधात तक्रारदेखील दाखल करण्यात आली आहे.
बच्चू कडू यांनी शुभम ऊर्फ गोलू माहोरे आणि एका अनोळखी व्यक्तीसोबत कट रचून अभिजित तायडे यांना अपघातात ठार मारण्याबाबत चर्चा केली. डिसेंबर महिन्यात बच्चू कडू यांच्या ‘कुरुळपूर्णा’ येथील निवासस्थानी ही बैठक पार पडली. या बैठकीत झालेले संभाषण मोबाईलच्या पॅमेऱयात पैद झाले असून साक्षीदाराने ते पुरावे पोलिसांकडे सुपूर्द केले होते. त्यानुसार हा गुन्हा नोंद केल्याची अधिकृत माहिती अमरावती पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी आज सकाळी झालेल्या पत्रकार परिषदेतून दिली. दरम्यान, कायदा व सुव्यवस्था बिघडू नी यासाठी पोलिसांनी अचलपूर व चांदूरबाजार परिसरात चोख बंदोबस्त तैनात केला आहे.
पुराव्यांची फॉरेन्सिक तपासणी होणार
तक्रारदार अभिजित तायडे यांनी संभाषणाची रेकार्ंडग असलेले पेन ड्राइव्ह पोलिसांना दिले असून प्रथमदर्शनी गुन्हा नोंद करण्यात आल्याचे पोलीस अधीक्षक आनंद यांनी स्पष्ट केले. या संभाषणाची तांत्रिक तपासणी करून पुरावे पडताळणीसाठी न्याय वैद्यकीय प्रयोगशाळेकडे पाठवण्यात येणार आहे. तसेच रेकार्ंडग झालेला मोबाईल जप्त करून फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवला जाणार असून त्याच्या अहवालानंतरच पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.


























































