ट्रेंड – नोकरी हवी तर किम जोंगला शिव्या घाल…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एका आयटी कंपनीतील  मुलाखतीचा व्हिडियो इंटरनेटवर व्हायरल होत आहे. मुलाखत घेणारा व्यक्ती उमेदवाराची खरी ओळख पटवण्यासाठी एक अजब टेस्ट घेतो. उमेदवाराला उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उनला जाडा आणि कुरूप म्हणण्यास सांगितले जाते. हे ऐकून उमेदवाराच्या चेहऱ्यावरच रंग उडतो. तो थरथर कापतो. त्यानंतर अचानक व्हिडिओतील स्क्रीन फ्रीज होते. अनेक स्पर्धक उत्तर कोरियाचे गुप्तहेर बनून अमेरिकन पंपन्यांत घुसखोरी करतात. या प्रकाराला आळा घालण्यासाठी उमेदवारांसमोर ही अट ठेवल्याचे कंपनीकडून सांगण्यात येते. नेटिझन्सने या व्हिडिओवर उलटसुलट प्रतिक्रिया दिल्या आहेत.