
बारामती विधानसभा मतदारसंघांमध्ये घेतलेली माघार म्हणजे महायुतीला पाठिंबा नाही. जेव्हा आम्ही ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला तेव्हा महायुतीतील नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकली होती. त्यामुळे त्यांनी सातत्याने आमच्या मनधरणीचे प्रयत्न केले, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.
महाराष्ट्रातील स्थानिक नेत्यांशी चर्चा करून बारामतीमध्ये उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. आम्ही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना पाठिंबा दिलेला नाही. 2029 मध्ये होणाऱया विधानसभा निवडणुकीमध्ये या ठिकाणी आमचा उमेदवार असेल, असेही सपकाळ यांनी स्पष्ट केले.

























































