असं झालं तर… गृहकर्जाचा विमा उतरवायचा असेल…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लोक मोठ्या संख्येने घर खरेदी करण्यासाठी गृहकर्ज घेतात. कर्ज प्रक्रियेत बँका आणि वित्तीय संस्था अनेकदा ग्राहकांना गृहकर्ज विमा घ्यायला लावतात.

गृहकर्ज विमा म्हणजे होम लोन इन्शुरन्स सहसा अनिवार्य असल्याचे सांगितले जाते. यामुळे सामान्य ग्राहकांना प्रश्न पडतो की, गृहकर्ज विमा अनिवार्य आहे की फक्त एक पर्याय.

आरबीआयच्या नियमानुसार, गृहकर्ज विमा अनिवार्य नाही. बँका किंवा वित्तीय संस्था कोणत्याही ग्राहकाला विमा खरेदी करण्यास भाग पाडू शकत नाहीत.

ग्राहक तो कोणत्याही विमा कंपनीकडून पॉलिसी खरेदी करू शकतो. बँका फक्त स्वतःच्या कंपन्यांकडून पॉलिसी खरेदी करण्यास भाग पाडू शकत नाही.

जर बँक किंवा एजंट गृहकर्जासोबत विमा खरेदी करण्याचा आग्रह धरत असेल, तर ग्राहक त्यांना आरबीआयच्या नियमांची लेखी प्रत मागू शकतात.