
लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असून पुढील काही तासांत सर्वच जागांचे निकाल हाती येतील. मतमोजणीचा कल पाहता लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपचा धुव्वा उडाला आहे. दुसरीकडे लोकसभा निवडणुकीसोबतच आंध्र प्रदेशात विधानसभा निवडणूक झाली. त्याचीही मतमोजणीस सुरू असून चंद्राबाबू यांची टीडीपी प्रचंड बहुमताने सत्तेत पुनरागमन करत आहे. येत्या 9 जूनला चंद्राबाबू नायडू यांचा मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी होईल, असे सांगण्यात येत आहे.
आंध्र प्रदेशात निवडणुकीच्या निकालाचा कल पाहता चंद्रबाबू नायडू यांचा पक्ष पुन्हा सत्तेत येणार हे जवळपास निश्चित झाले आहे. कल पाहता टीडीपी स्वबळावर सत्ता स्थापन करू शकते, असं चित्र आहे. ही निवडणुकीत चंद्राबाबू नायडू यांची टीडीपी आणि भाजप यांच्या युतीने निवडणूक लढवली आहे.
निवडणूक आयोगाच्या सध्याच्या आकडेवारीनुसार आंध्र प्रदेशात टीडीपी 13४ जागांवर आघाडीवर आहे. भाजप 8 जागांवर तर आंध्र प्रदेशात सध्या सत्तेत असलेली जगनमोहन रेड्डी यांची वायएसआर काँग्रेस 12 जागांवर आघाडीवर आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी राजीनामा देण्यासाठी दुपारी 4 वाजता राज्यपालांच्या भेटीची वेळ मागितली आहे.
आंध्र प्रदेशात विधानसभेच्या एकूण 175 जागा आहेत. या निवडणुकीत जगनमोहन रेड्डी यांच्या पक्षाने सर्व 175 जागा लढवल्या. तर चंद्राबाबू नायडू यांच्या टीडीपीने 144 जागा आणि भाजपने 10 जागा लढवल्या. या शिवाय अभिनेता आणि नेता पवन कल्याण याच्या नेतृत्वाखालील जन सेना पार्टीने 21 जागा लढल्या.