
>> महेश कोळी ([email protected])
1 एप्रिल 2026 रोजी अमेरिकेच्या नासाने `आर्टेमिस-2′ यशस्वीरीत्या प्रक्षेपित केला. ही मोहीम केवळ चांद्रप्रदक्षिणा नसून येणाऱया पिढय़ांना प्रेरणा देणारी आणि विश्वाचे गूढ उकलण्याच्या प्रवासात एक निर्णायक वळण ठरणारी आहे.
जवळपास पाच दशकांहून अधिक काळ लोटल्यानंतर मानवाने पुन्हा एकदा पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण कक्षेला ओलांडून चंद्राच्या दिशेने झेप घेतली आहे. 1 एप्रिल 2026 रोजी अमेरिकेच्या नॅशनल एरोनॉटिस अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशनने (नासा) आपल्या महत्त्वाकांक्षी `आर्टेमिस’ कार्पामाचा दुसरा टप्पा म्हणजेच `आर्टेमिस-2′ यशस्वीरीत्या प्रक्षेपित केला. 1972 मधील अपोलो 17 मोहिमेनंतर मानवी अंतराळ प्रवासाच्या इतिहासातील ही सर्वात लांबची आणि महत्त्वाची मोहीम मानली जात आहे. फ्लोरिडा येथील केनेडी अंतराळ केंद्रातून `स्पेस लॉन्च सिस्टम’ (एस-एल-एस) या महाकाय रॉकेटच्या साहाय्याने ओरियन अंतराळ यान अंतराळात झेपावले असून यामध्ये चार अंतराळवीरांचा समावेश आहे. ही मोहीम केवळ चांद्रप्रदक्षिणा नाहीये, भविष्यातील मंगळ मोहिमा आणि चंद्रावर कायमस्वरूपी मानवी वस्ती स्थापन करण्याच्या दृष्टीने ती एक महत्त्वाचा आधार ठरणार आहे.
या मोहिमेचा मुख्य उद्देश मानवी अंतराळ प्रवासाच्या मर्यादा तपासणे आणि नवीन तंत्रज्ञानाची प्रत्यक्ष वातावरणात चाचणी करणे हा आहे. आर्टेमिस-2 ही एक क्रूड फ्लायबाय’ मोहीम आहे. याचा अर्थ असा की, अंतराळवीर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार नाहीयेत, तर चंद्राच्या मागच्या बाजूने एक विस्तीर्ण वळण घेऊन पृथ्वीवर परततील. या दहा दिवसांच्या प्रवासात ओरियन यान पृथ्वीपासून सुमारे 3,93,000 किलोमीटर अंतरापर्यंत मजल मारेल. चंद्राला प्रदक्षिणा घालून पृथ्वीवर परतणे, ही कल्पना ऐकायला रम्य वाटत असली तरी प्रत्यक्षात ती प्रचंड आव्हानांनी भरलेली आहे. यातील सर्वात मोठे आव्हान`ओरियन’ यानाची जीवन रक्षक प्रणाली (लाईफ सपोर्ट सिस्टम) आणि उष्णता प्रतिबंधक कवच (हीट शील्ड) यांची अचूकता तपासणे हे आहे.
आर्टेमिस-2 मध्ये कमांडर रीड वाईजमन यांच्या नेतृत्वाखालील पथकात पायलट व्हिटर ग्लोव्हर, मिशन स्पेशालिस्ट ािढस्टीना कोच आणि कॅनेडियन अंतराळ संस्थेचे जेरेमी हॅन्सन यांचा समावेश आहे. क्रिस्टीना कोच यांच्याकडे आधीच सर्वात लांब एकल अंतराळ प्रवासाचा पामाची पार्श्वभूमी असून या मोहिमेद्वारे त्या चंद्राच्या कक्षेत पोहोचणाऱया पहिल्या महिला ठरल्या आहेत. हे चारही तज्ञ चंद्राच्या `फार साईड’चे म्हणजेच पृथ्वीवरून कधीही न दिसणाऱया भागाचे प्रत्यक्ष निरीक्षण करणार आहेत. आजवर केवळ उपग्रहांच्या माध्यमातून या भागाची छायाचित्रे उपलब्ध होती, परंतु मानवी डोळ्यांनी केलेले हे निरीक्षण भविष्यातील लँडिंग साईटस् निवडण्यासाठी अत्यंत मोलाचे ठरेल. या प्रवासादरम्यान अंतराळवीर उच्च तंत्रज्ञान असलेल्या उपकरणांसोबतच आधुनिक स्मार्टफोनचा वापर करून प्रतिमा घेणार आहेत.
आर्टेमिस-2 मोहिमेचे यश `आर्टेमिस-3′ या मोहिमेचा मार्ग मोकळा करणार आहे. या आगामी मोहिमेमध्ये प्रत्यक्षात मानवाचे पाऊल चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पडणार आहे. दक्षिण ध्रुवावर बर्फाच्या स्वरूपात पाणी असण्याची दाट शक्यता असल्याने तिथे मानवी तळ उभारणे शक्य होऊ शकते. या पाण्याचा उपयोग केवळ पिण्यासाठीच नाही, तर त्यातून हायड्रोजन आणि ऑक्सिजन विलग करून रॉकेट इंधन तयार करण्यासाठीही होऊ शकतो. अशा प्रकारे चंद्र हा मंगळाकडे जाणाऱया प्रवासातील एक `फ्यूएल स्टेशन’ म्हणून विकसित होऊ शकतो. म्हणूनच आर्टेमिस-2 एक दीर्घकालीन अंतराळ वसाहतवादाची रंगीत तालीम आहे असे म्हणावे लागेल.
शेवटी या मोहिमेचा सामाजिक आणि जागतिक परिणामही तितकाच व्यापक आहे. शीतयुद्धाच्या काळातील अंतराळ स्पर्धा आता आंतरराष्ट्रीय सहकार्यात बदलली आहे. यामध्ये कॅनडासारखे देशही सािढय सहभागी आहेत. 10 दिवसांच्या या प्रवासानंतर ओरियन यान जेव्हा पॅसिफिक महासागरात उतरेल, तेव्हा मानवाच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावलेल्या असतील. चंद्राच्या पृष्ठभागावरून येणारी नवनवीन माहिती, अंतराळातील रेडिएशनचा मानवी शरीरावर होणारा परिणाम आणि दीर्घकाळासाठी अंतराळात राहण्याचे तंत्रज्ञान या सर्वच बाबतीत आर्टेमिस-2 एक मैलाचा दगड ठरेल. मानवाचे चंद्रावर जाणे हे आधुनिक विज्ञानाचे तसेच मानवी जिद्दीचे आणि नवनवीन सीमा ओलांडण्याच्या आदिम प्रवृत्तीचे यश असणार आहे. ही मोहीम येणा ऱया पिढय़ांना प्रेरणा देणारी आणि विश्वाचे गूढ उकलण्याच्या प्रवासात एक निर्णायक वळण ठरणारी आहे.
(लेखक संगणक अभियंता आहेत)




























































