सरदार शहाजीराजे शिंदे यांचे कुंडलापूरचे समाधी स्थळ 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ग्वाल्हेरच्या शिंदे घराण्याचे वंशज व छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजोळचे जवळचे नातलग सरदार शहाजीराजे शिंदे. वाघोली, गर्जेवाडी, ढालगाव, तिसंगी आणि कुंडलापूर या पाच गावांची जहागिरी शिंदे घराण्याकडे होती. त्यावेळी विजापूरच्या आदिलशाहाची सत्ता होती. विजापूर-गुहागर या मार्गावरील खानापूर येथे आदिलशाहीच्या रसदीचे ठिकाण होते. ही रसद तोडण्यासाठी सरदार शहाजी शिंदे यांनी योजना आखली आणि यावेळी झालेल्या लढाईत त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पत्नीने धाडस करुन सरदार शहाजींचा मृतदेह ताब्यात घेऊन, सांगली, कुडलापूर येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले. हेच त्यांचे समाधीस्थळ आहे. समाधीस्थळी एक शिलालेख असून त्यावर मोडी लिपीतील काही अक्षरे, चौथरे, गावकुस (तट), सतीचा हात, गावाच्या वेशीचे अवशेष, सतीची शिळा अशा ऐतिहासिक पाऊलखुणा पाहावयास मिळतात. सरदार शहाजी शिंदे यांच्या परामाची महती सांगणारे हे स्मारक दुर्लक्षित आहे. स्मारकाच्या काही चिरा निखळल्या असून काही भाग झुडपाच्या विळख्यात आहे.