
>> रविप्रकाश कुलकर्णी
दिवाळी अंकाप्रमाणे गुयाला विशेष अंक प्रसिद्ध करण्याची परंपरा प्रा. नरेंद्र पाठक यांनी सुरू केली. ‘चैत्रेय वासंतिक’ या अंकाचे हे 25 वे वर्ष. ललित आणि वैचारिक स्वरूपाच्या अभिरूचीपूर्ण साहित्याचा समावेश असलेल्या या अंकाला चोखंदळ वाचकांचा चांगला प्रतिसाद लाभतो. या रौप्य महोत्सवी अंकाचे प्रकाशन नुकतेच पार पडले. अशा या ही चैत्र-वासंतिक वाङ्मयीन चळवळीची ही नोंद.
भारतीय ऋतुचक्रातील पहिला व सर्वोत्तम मानला गेलेला ऋतू म्हणजे वसंत ऋतु. फुले, फळे, पाने, भ्रमर आणि कोकिळा हे सर्वप्रथम या ऋतूच्या आगमनाची सूचना देतात. त्याच्या स्वागतासाठी एकेकाळी या भारतवर्षात वसंत उत्सव, मदन उत्सव, अशोक उत्सव, असे उत्सव एकेकाळी साजरे केले जात असत, पण इंग्रजांच्या आगमनानंतर आम्ही हळूहळू सगळ्या गोष्टीला तिलांजली देत आमचे म्हणून जे काही होते ते टाकून जणू सत्वच हरवून बसलो… पण वसंत मात्र आपलं काम करत राहिला आणि काही जिंदादिल माणसं वसंत उत्सवात त्यांच्या त्यांच्या परीने सामील होत राहिली. त्यातलाच एक प्रकार म्हणजे दिवाळीला जसा दिवाळी अंक काजातो, त्याप्रमाणे वसंत ऋतूत वासंतिक अंक कायाची प्रथा सुरू झाली. ही प्रथा सुरू करण्याचे श्रेय ना. सी. फडके यांच्याकडे जाते. त्यातूनच प्रेरणा घेऊन ठाणे येथील प्राध्यापक नरेंद्र पाठक यांनी ‘चैत्रेय’ हा वासंतिक विशेषांक सुरू केला. सध्या मासिक काय किंवा दिवाळी अंक काय यात सातत्य टिकवणे किती अवघड आहे हे वेगळं सांगायला नको. अशा विपरीत परिस्थितीत प्राध्यापक नरेंद्र पाठक यांनी अक्षरशः जिवाचं रान करून ‘चैत्रेय’चं संगोपन केलं आणि आता या गोष्टीला पंचवीस वर्षे झालेली आहेत. अर्थात ‘चैत्रेय’चा रौप्य महोत्सव सोहळा अटळच. इथे हेही सांगायला हवे की, सध्या केवळ वासंतिक विशेष अंक का‘चैत्रेय’ हा मराठीतील एकमेव अंक आहे. यावरून हे काम किती अवघड आहे हे लक्षात येते. म्हणूनच त्याचे स्वागत करायचे आणि शुभेच्छा द्यायच्या.
यानिमित्ताने वासंतिक अंकाच्या इतिहासाकडे एक ओझरता दृष्टिक्षेप टाकू या. मराठी कादंबरीचे जादूगार असा ज्यांचा लौकिक झाला होता ते ना. सी. फडके प्राध्यापक म्हणून निवृत्त होऊन कोल्हापूरहून पुण्यास आले आणि त्यांनी ‘अंजली’ दिवाळी अंक सुरू केला. आता ‘अंजली’ दिवाळी अंक म्हटला की, त्यात फडके यांची गुलजार कादंबरी असणं अटळच. वाचक जणू त्याची वाट पाहत असत, पण त्या वेळी फडके यांचा कादंबरी लेखनाचा झपाटा इतका होता की, त्याच्या प्रकाशनासाठी पुच्या दिवाळीची म्हणजे वर्षभर थांबणे नकोसे वाटले. म्हणून फडके यांनी दिवाळी अंकानंतर ‘अंजली’चा वासंतिक अंक सुरू केला आणि त्याचे स्वागतही चांगले झाले.
विशेष म्हणजे या गोष्टीचे काही जणांनी अनुकरणदेखील केले. त्याला फार मोठा पाठिंबा नसेल मिळाला, पण अधूनमधून वासंतिक विशेषांक निघत राहिले. त्यामध्ये पुण्यातील ‘तरुण भारत’चा विशेष उल्लेख करायला हवा. त्यांनी राज्यस्तरीय कथा स्पर्धा घेतली होती. त्या कथा स्पर्धेचे परीक्षक होते श्री. ज. जोशी. त्यात प्रथम क्रमांक मिळाला होता, पुज्यांचा लौकिक इरसाल ग्रामीण कादंबरीकार म्हणून झाला ते व. बा. बोधे. दुसऱया क्रमांकाचे लेखक आता माझ्या लक्षात नाही, पण तिसरा क्रमांक होता ज्यांचा आज मोठय़ा पल्याचा कादंबरीकार म्हणून गौरव होतो, तो लेखक म्हणजे विश्वास पाटील! विशेष म्हणजे ही गोष्ट पाटील आजही गौरवाने सांगतातच. एवच नव्हे तर त्यांच्या कादंबरीत त्यांची जी ओळख देतात त्यात ही गोष्ट नमूद केलेली असते.
त्यानंतर वासंतिक अंक कायाचा प्रयोग काही जणांनी करून पाहिलेला दिसतो ज्यात ‘चंद्रकांत’, ‘धनंजय’ यांसारख्या प्रस्थापित अंकांचा समावेश आहे.
पण या ना त्या कारणाने त्यात सातत्य राहिलं नाही. अशा पार्श्वभूमीवर ‘चैत्रेय’ने सलग पंचवीस वर्षे बाजी मारली हे कौतुकास्पदच आहे.
‘चैत्रेय’चा हा रौप्य महोत्सवी डंका जोशात हे वेगळं सांगायला नको. या अंकात ‘चैत्रेय’ने पंचवीस वर्षांत वाचकांना काय दिले याचा लेखाजोखा प्रवीण दवणे, चांगदेव काले यांनी घेतला आहे. ‘गाथा सप्तशती’, त्याचे अभिजातपण नव्याने सांगितले आहे. शिवाय ‘चैत्रेय’मध्ये कायम बाल वाङ्मयासाठी स्वतंत्र विभाग राहिलेला आहे आणि तो एकनाथ आव्हाड यांनी कायम सांभाळलेला आहे. त्याचा आया अंकात आहे. याखेरीज नेहमीचा भरगच्च कथा लेख, कविता विभाग आहे.
असा पंचवीस वर्षांचा एक कठीण टप्पा ‘चैत्रेय’ने आता पार पाडला आहे. यापुत्यांचा प्रवास अधिक संपन्न आणि सुखकारक होवो अशा त्यांना शुभेच्छा देऊ या.






























































