अदानीच्या रात्रीच्या कामाचा रहिवाशांना त्रास, जाब विचारायला गेलेले नगरसेवक जोसेफ कोळी यांच्यावर हल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

धारावीत रात्रीच्या वेळेस अदानीकडून केल्या जाणाऱया कामाविरोधात नागरिकांच्या संतापाचा भडका उडाला. रात्रीच्या कामामुळे परिसरात धूळ, माती व चिखल होऊन त्याचा आरोग्यावर परिणाम होत असल्याने नागरिक त्रस्त झालेत. याचा जाब विचारण्यासाठी सरसावलेल्या शिवसेना नगरसेवक जोसेफ कोळी यांच्यावर हल्ला करण्यात आला.

धारावीच्या शाहूनगर परिसरात अदानी समुहाकडून कामकाज केले जात आहे. रात्रीच्या वेळेस डंपरची ये-जा होत असल्याने परिसरात धूळ, चिखल, मातीचे साम्राज्य पसरले असून त्यामुळे सर्दी, खोकला या आजारांनी नागरिक बेजार झाले आहेत. नगरसेवक जोसेफ कोळी हे सामान्य जनतेच्या न्याय्य हक्कासाठी अदानी समूहाशी संवाद साधण्यासाठी गेले असता त्यांच्यावर अदानीच्या गुंडांनी हल्ला केला. त्यांच्या डाव्या हाताला दुखापत झाली. असे असताना उलट तेथील सुरक्षा रक्षकाला मारहाण केल्याच्या आरोपाखाली चौघांविरोधात शाहूनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.