
अयोध्येतील राम मंदिरात आज एका कश्मिरी व्यक्तीने नमाज पठण करण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे.
दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. एका तरुणीसह दोघेजण राम मंदिराच्या ‘डी वन’ गेटमधून आत घुसले. सीता रसोईजवळ तिघांपैकी एकाने एक कपडा अंथरला. तो नमाज पठणाला सुरुवात करणार, तोच सुरक्षा रक्षकांनी त्यांनी पकडले. त्यानंतर त्याने घोषणाबाजी सुरू केली. पोलिसांनी पकडलेल्या तरुणाचे नाव अबू अहमद शेख असून तरुणीचे नाव सोफिया आहे. तिसऱया तरुणाचे नाव समजू शकलेले नाही.






























































