
‘आयुष्मान वय वंदना कार्ड’द्वारे 70 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचारांची सोय मिळणार आहे. हे कार्ड आयुष्मान भारत योजनेचा भाग आहे.
हे कार्ड ऑक्टोबर 2024 पासून प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत लागू करण्यात आले आहे. त्यासाठी उत्पन्न मर्यादा वगैरे विचारात घेतली जाणार नाही.
या योजनेंतर्गत 70 वर्षांवरील नागरिकांना दरवर्षी तब्बल 10 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचारांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
ही योजना पूर्णपणे पॅशलेस आणि पेपरलेस पद्धतीने राबविण्यात येत आहे. शासनमान्य सरकारी तसेच खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेता येतात.
ऑनलाइन पोर्टल किंवा अधिकृत अॅपच्या माध्यमातून ‘वय वंदना’ कार्ड तयार करू शकता. प्राथमिक आरोग्य पेंद्र, सेतू सुविधा पेंद्र येथेही कार्ड काढण्याची सुविधा आहे.


























































