
भाजप हा आतापर्यंत केवळ पैसे खाणाऱयांचा पक्ष होता. तो आता बलात्काऱयांचा पक्ष झाला आहे, असा जबरदस्त टोला वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी लगावला. भाजपने बदलापूर बलात्कार प्रकरणातील आरोपीला स्वीकृत नगरसेवक पद दिले आहे. त्यामुळे आपल्या कुटुंबातील मुली सुरक्षित ठेवायच्या असतील तर भाजपला मतदान करू नका, असेही अॅड. आंबेडकर यावेळी म्हणाले.
भाजपचे हे जे नवीन पॅरेक्टर उभे राहत आहे, त्याला आम्ही बदलू शकत नाही. या पॅरेक्टरला बदलायचे असेल तर भाजप व संघाला मतदान करणारा मतदारच ते बदलू शकतो. भाजप व संघाने व्यभिचाराचा मार्ग अवलंबला आहे. ते थांबवणे आमच्या नव्हे तर तुमच्या हातात आहे, असेही आंबेडकर म्हणाले.





























































