Chhattisgarh Naxal Encounter – 36 तास चकमक, 14 नक्षलवाद्यांचा खात्मा, 1 कोटीचे बक्षीस असलेला चलपतीही ठार

छत्तीसगडमधील गरियाबंदमध्ये 36 तासांहून अधिक काळ चाललेल्या चकमकीत सुरक्षा दलांच्या जवानांना मोठे यश आले आहे. चकमकीत जवानांनी 14 नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. कुल्हाडीघाट संरक्षित घनदाट जंगलात सुरक्षा दलांकडून नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली.

छत्तीसगड-ओडिशा सीमेवर गरियाबंदमध्ये सुरक्षा दलांचे जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये 36 तासांहून अधिक वेळ चमकच चालली. काल सकाळी कुल्हाडीघाटमधील भालुडिग्गीच्या टेकड्यांवर ही चकमक सुरू झाली. या चकमकीत सुरक्षा दलांच्या हाती आतापर्यंत 14 नक्षलवादी ठार झाले आहेत.

चकमकीनंतर सुरक्षा दलांच्या जवानांकडून शोध मोहीम राबवण्यात आली. या मोहीमेत काल जवानांना दोन नक्षलवाद्यांचे मृतदेह आढळून आले. तर आज सकाळी 12 नक्षलवाद्यांचे मृतदेह आढळले. या कारवाईत सुरक्षा दलाच्या जवानांनी मोठ्या प्रमाणात नक्षलवाद्यांची शस्त्रे जप्त केली आहेत. यात अनेक स्वयंचलित शस्त्रांचा समावेश आहे. यासह 1 कोटींचे बक्षीस असलेला ओडिसा राज्याचा नक्षलवाद्यांचा म्होरक्या जयराम उर्फ चलपती हा ही ठार झाल आहे. या चकमकीत 1 जवान जखमी झाला. त्याला एअलिफ्ट करून रायपूरला उपचारासाठी आणण्यात आले. या संयुक्त मोहीमेत ओडिशा-छत्तीसगडमधील सुरक्षा दलांच्या 1 हजार जवानांनी दोन्ही राज्यांच्या सीमेवर घेरले होते.