
हिंगोली नगर परिषदेमध्ये सध्या मटकाकिंग व जबरदस्तीने प्लॉट बळकावणाऱयांची दादागिरी वाढली आहे. हे लोक व्यापाऱयांना चौकशी लावण्याच्या धमक्या देत आहेत. त्यामुळे ‘हम ईंट का जवाब पत्थर से देना जानते हैं’ असे म्हणत त्यांना त्यांची जागा दाखवा, असा हल्लाबोल भाजपचे आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्यावर केला. यावरून हिंगोली नगराध्यक्षपदावरून भाजप आणि शिंदे गटात सुंदोपसुंदी सुरू झाल्याचे चित्र आहे.
मागील काही दिवसांपासून हिंगोली नगराध्यक्षपदावर शिंदे गट आणि भाजपकडून दावा केला जात आहे. त्यातच नगर परिषदेची निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारीही सुरू असल्याचे जिल्हाध्यक्ष छाती बडवून सांगत आहेत. शनिवारी भाजप आमदार मुटकुळे म्हणाले की, हिंगोली नगर परिषदेमध्ये सध्या काय सुरू आहे, तर मटका चालवणारे…प्लॉटवर कब्जा करणाऱयांची दादागिरी वाढली आहे. हे लोक प्रत्येक व्यापाऱयाच्या घरी जाऊन चौकशीच्या धमक्या देत आहेत.
























































