
नरेंद्र मोदी यांची सभा बारामतीमध्ये होणार का? या प्रश्नावर अजित पवार यांनी बारामतीतील लढत ही आमच्या परिवारातील लढत आहे. असे सांगत मोदींच्या सभेस नकार दिला.
अजित पवार म्हणाले, राष्ट्रीय नेते येतात तेव्हा जिह्यात सभा घेतात. 2024 मध्ये बारामतीत मोदी यांची सभा झाली होती. याकडे लक्ष वेधले असता पवार म्हणाले, तेव्हा अजित पवार नावाचा कोणी तरी नक्की उभा होता. त्यांना पराभूत करायचं म्हणून त्यांनी सभा घेतली. आता त्यांना निवडून आणायचे म्हणून सभा घेतली नाही. मी एकटा पुरेसा आहे. महायुतीकडून मोदी यांच्या सभा जास्तीत जास्त ठिकाणी आयोजित केल्या जात असताना अजित पवार यांनी त्यांच्या सभेस नकार दिला आहे.
बटेंगे तो कटेंगे मान्य नाही
मी महायुतीत एक घटक पक्ष आहे. किमान समान कार्यक्रमामुळे एकत्र आलो. आमच्या विचारधारा भिन्न आहेत. माझी विचारधारा शिवशाही, फुले, आंबेडकर यांची आहे. ती कायम राहणार आहे. त्यामुळे ‘बटेंगे तो कटेंगे’ हे मान्य नाही असे अजित पवार फडणवीसांच्या ट्विटबद्दल म्हणाले.