Photo – अभ्यास तोपची… नाशिकच्या देवळालीत धडाडल्या आर्टिलरी गन्स

प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी 21 जानेवारी रोजी नाशिकमधील देवळाली येथील संयुक्त अग्नि शक्ति अभ्यास स्कूल ऑफ आर्टिलरीमध्ये अग्नि शक्ति प्रदर्शनाचा ‘अभ्यास तोपची’ हा वार्षिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. लेफ्टनंट जनरल एन. एस. सरना यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या कार्यक्रमाला वेलिंग्टनच्या डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेजचे कमांडंर लेफ्टनंट जनरल मनीष एरी मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. या प्रदर्शनासाठी हिंदुस्थानी लष्कराचे वरिष्ठ अधिकारी, नेपाळ आर्मी स्टाफ कॉलेजचे अधिकारी, नागरी प्रशासनातील मान्यवर आणि महाराष्ट्रातील विविध शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.