Crime News – डॉलरऐवजी दिले कागदाचे बंडल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

डॉलरऐवजी कागदी बंडल देऊन चालकाच्या दोन लाख रुपयांच्या फसवणूकप्रकरणी तिघांना सांताक्रुझ पोलिसांनी अटक केली.

जमीदर शेख, इनामुल शेख आणि साहिल शेख अशी त्या तिघांची नावे आहेत. त्या तिघांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

तक्रारदार हे चालक असून ते विरार येथे राहतात. गेल्या महिन्यात ते घोडबंदर रोड येथील फाऊंटन हॉटेलजवळ आले होते. तेव्हा एक जण तेथे आला. त्याने त्याच्याकडे 32 हजार अमेरिकन चलन असल्याचे सांगितले. ते चलन हिंदुस्थानी चलनात बदलायचे आहे असे भासवले. त्याच्याकडे पासपोर्ट नसल्याने ते चलन बदलता येत नाही. त्यामुळे मदत करावी. जर मदत केल्यास दोन टक्के कमिशन देऊ असे तक्रारदार यांना सांगण्यात आले होते. त्यानंतर तक्रारदार यांनी मदत करण्यास होकार दिला.

25 जानेवारीला तक्रारदार हे एका रेल्वे स्थानकात आले. तेव्हा तिथे इनामुलसोबत आणखी तीन जण होते. त्यांना एक अमेरिकन चलन दिले. ते चलन घेऊन ते एका कार्यालयात गेले. ते चलन खरे असल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यानंतर त्यांनी तक्रारदार यांना चलन देतो, असे सांगून दोन लाख रुपये घेतले. तसेच 32 हजार अमेरिकन चलन देऊन ते निघून गेले. काही अंतर गेल्यावर त्यांनी पिशवीतील चलन पाहिले. त्यात अमेरिकन चलनाऐवजी कागदी बंडल होते. घडल्याप्रकरणी त्यांनी सांताक्रुझ पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला. तपासा दरम्यान पोलिसांना जमीदर, इनामुल आणि साहिलची माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्या तिघांना अटक केली. त्या तिघांना अटक करून न्यायालयात हजर केले होते.

टास्कच्या बहाण्याने फसवणूक करणाऱ्याला अटक

टास्कच्या नावाखाली साडेदहा लाख रुपयांच्या फसवणूकप्रकरणी उत्तर प्रादेशिक सायबर
पोलिसांनी एकाला अटक केली. नारायण माळी असे त्याचे नाव आहे. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले होते.

तक्रारदार हे मालवणी येथे राहतात. ते परदेशात जहाजावर काम करतात. जानेवारी महिन्यात ते घरी होते. तेव्हा एकाने त्यांना व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जोडले. त्यांना पार्टटाइम नोकरी ऑफर असल्याचे भासवले. ठगाने त्यांना टास्कच्या माध्यमातून घर बसल्या पैसे कमावता येतील, अशा भूलथापा मारल्या. त्यावर विश्वास ठेवून त्यांनी टास्कसाठी होकार दिला. तसेच टास्क पूर्ण केल्यावर त्यांना जास्त कमिशन दिले जाईल, असे सांगण्यात आले. ठगाने त्यांना अप्स डाउनलोड करण्यास भाग पाडले.

टास्कच्या नादात त्यांनी 10 लाख 59 हजार रुपयांची गुंतवणूक केली. गुंतवणूक केल्यावर त्यांना कोणताही परतावा परत मिळाला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी उत्तर प्रादेशिक सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला. वरिष्ठ निरीक्षक किरण आहेर यांच्या पथकातील उप निरीक्षक अमोल कांबळे, पावसकर, मेघे, कोरे आदींच्या पथकाने तपास सुरू केला. तपासा दरम्यान पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाली. पोलिसांचे पथक गुजरात येथे गेले. तेथून पोलिसांनी नारायणला ताब्यात घेऊन अटक केली. तो ऑनलाइन फसवणूक करणाऱया ठगांच्या संपका&त होता. त्याने स्वतःसह काही जणांची बँक खाती उघडून ती ठगांना दिली होती होती.

 

41 लाखांची घरफोडी करणारा अटकेत

वृद्ध व्यावसायिकाच्या घरी 41 लाखांच्या घरपह्डीप्रकरणी एकाला विलेपार्ले पोलिसांनी अटक केली. मोहंमद शाकीर शेख असे त्याचे नाव आहे. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

तक्रारदार हे ज्येष्ठ नागरिक असून ते विलेपार्ले येथे पत्नी सोबत राहतात. त्यांचा शेअर मार्पेटमध्ये गुंतवणुकीचा व्यवसाय आहे. गेल्या महिन्यात ते सायंकाळी चहा पिण्यासाठी हनुमान रोड येथे गेले होते. तर त्यांची पत्नी कामानिमित्त बाहेर गेली होती. सायंकाळी त्यांची पत्नी घरी आली. त्यांच्या पत्नीने तक्रारदार यांना पह्न केला. काही वेळाने तक्रारदार हे घरी आले. तेव्हा त्यांना घराचे सेफ्टी लॉक आणि मुख्य दरवाजाचे लॉक तुटलेले दिसले. घरातील वस्तू अस्ताव्यस्त पडल्या होत्या. कपाटातील दागिन्यांची पाहणी केली. अज्ञात चोरटय़ाने त्यांचा सोन्याचा आणि चांदीचा असे 41 लाख रुपयाचा ऐवज चोरून नेला होता. याची माहिती त्याने विलेपार्ले पोलिसांना दिली.

काही वेळात पोलीस घटनास्थळी आले. विलेपार्ले पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला. तपासासाठी पथक तयार केले होते. पोलिसांनी त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी मोहंमदला ताब्यात घेतले. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले होते.