विदर्भ साहित्य संघाच्या अध्यक्षपदी गिरीश गांधी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तब्बल 20 वर्षानंतर झालेल्या विदर्भ साहित्य संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत  माजी आमदार डॉ. गिरीश गांधी यांची बहुमताने निवड झाली. त्यांनी चार प्रतिस्पर्धी उमेदवारांचा एकतर्फी पराभव केला. गांधी यांना 2661, श्रीपाद जोशी 701, प्रदीप दाते 1187, रंजन दारव्हेकर 114, रविंद्र शोभणे यांना 205 मते पडली. 22 जणांच्या कार्यकारिणीची मतमोजणी सुरु झाली असून सोमवारी निकाल जाहीर होणार आहे.

विदर्भ साहित्य संघाच्या निवडणूक अनेक कारणांमुळे गाजली. मतदान प्रक्रियेवरून गदारोळ उडाला. यासंदर्भात, लवादाकडेही दाद मागण्यात आली होती. मतपत्रिका पळवण्यात आल्याचा आरोप झाला. पेंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजपचे नेते व कार्यकर्ते या निवडणुकीत काम करीत असल्याचे आक्षेप उमेदवारांकडून घेण्यात आले होते.  निवडणुकीचा हा गदारोळ शनिवारी संध्याकाळी सहा वाजता संपुष्टात आला आज मतदान पार पडले.

4935 जणांचे मतदान

विदर्भ साहित्य संघाने 7 हजार 493 मतदारांना पोस्टाने मतपत्रिका पाठविल्या होत्या. त्यापैकी 2,007 मतपत्रिका या चुकीच्या पत्त्यामुळे परत आल्या. यातील 506 मतदारांनी आपली ओळख पटवून मतदान केले. अखेरपर्यंत 4 हजार 935 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. त्यापैकी टपालाने 1 हजार 529, मतदारांकडून 505 तर प्रतिनिधीद्वारे 2 हजार 831 मतपत्रिकांचे मतदान झाले.