
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यावर पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये अँजिओप्लास्टी शस्त्र्क्रिया करण्यात आली. अचानक छातीत दुखू लागल्याने गुरुवारी त्यांना रुबीमध्ये दाखल करण्यात आले होते.
गुढीपाडव्यानिमित्त मुख्यमंत्री सावंत हे आपल्या मुलीला भेटण्यासाठी पुण्यात आले होते. मात्र अचानक छातीत दुखू लागल्याने त्यांना रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्यावर अँजिओप्लास्टी शस्त्र्ाक्रिया करण्यात आली. शस्त्र्ाक्रियेनंतर त्यांना तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्या आवश्यक वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्याचे रिपोर्ट नॉर्मल आले आहेत. शस्त्रक्रियेनंतर त्यांच्या शरीरातील रक्ताभिसरण आणि हृदयाची गती पूर्वपदावर आली आहे. आता त्यांची प्रकृती स्थिर असून सुधारणा होत असल्याने त्यांना आज घरी सोडण्यात आल्याचे रुबीचे विश्वस्त डॉ. परवेज ग्रँट यांनी सांगितले.


























































