
सोशल मीडियावर रोज अनेक गोष्टी व्हायरल होत असतात. त्यापैकी काही नोकरी सोडण्यासाठीचे, पगार वाढीचे किंवा सुट्ट्याच्या अर्जाचे प्रमाण वाढले आहे. आपल्या बॉसला लिहिलेले हे अर्ज सोशल मीडियावर धुमाकूळ घालतायत. असाच एक अर्ज पुन्हा एकदा व्हायरल झालयं. यामध्ये गुरगावच्या एका कर्मचाऱ्याने गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप झाल्याने एका सुट्टीचा अर्ज केलाय. आणि तो अर्ज कंपनीच्या बॉसने most honest leave application” असं म्हणत मंजूरही केलाय.
Got the most honest leave application yesterday. Gen Z doesn’t do filters! pic.twitter.com/H0J27L5EsE
— Jasveer Singh (@jasveer10) October 28, 2025
गुरगावच्या एका कंपनीचे CEO जसवीर सिंगने X वर एक पोस्ट शेअर केली. जसवीर यांना एका कर्मचाऱ्याकडून एका वैयक्तिक कारणास्तव सुट्टीची विनंती करणारा ईमेल आला. या ईमेलवर लिहिलेला मजकूर पाहिल्यावर असे जाणवले की आता तरूणाई त्यांच्या भावना आणि मानसिक आरोग्याबद्दल अधिकाधिक स्पष्टपणे बोलताना दिसतात. कारण त्या कर्मचाऱ्याने अर्जात ब्रेकअपनंतर कामावर लक्ष केंद्रित करता येत नाही. त्यामुळे यातून सावरण्यासाठी काही दिवसांच्या रजेची आवश्यकता असल्याचे कर्मचाऱ्याने अर्जात म्हटले.
माझे अलिकडेच ब्रेकअप झाले आहे. त्यामुळे मी कामावर लक्ष केंद्रित करू शकत नाहीए. मला एक छोटा ब्रेक हवा आहे. मी आज घरून काम करत आहे. म्हणून मी २८ तारखेपासून ८ तारखेपर्यंत रजा घेऊ इच्छितो, असा मजकूर त्या अर्जात लिहिण्यात आलाय. आता हा रजेचा अर्ज सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. या पोस्टवर अनेक वापरकर्त्यांनी कर्मचाऱ्याच्या प्रामाणिकपणाचे कौतुक केले.




























































