
कोपर आणि गुडघ्यांवरील काळेपणा नकोसा वाटतो. घरगुती उपायाने काळेपणा दूर होऊ शकतो. लिंबाच्या पह्डीवर बेकिंग सोडा टाकून कोपर किंवा गुडघ्यांवरून फिरवा. नंतर कोमट पाण्याने त्वचा स्वच्छ धुवा.
मॉइश्चरायझर किंवा खोबऱयाचे तेल लावा.
आपली त्वचा खूपच संवेदनशील असेल तर दही आणि बेसन एकत्र करून त्याचा लेप लावा. यामुळे त्वचेवरील कोरडेपणा कमी होतो आणि त्वचा नैसर्गिकरीत्या उजळते. आंघोळीनंतर तिथे नियमित तेल किंवा लोशन लावण्याची सवय लावा.


























































