हे करून पहा- डोळ्यांखालील डार्क सर्कल घालवण्यासाठी…

घरात, विशेषतः आपल्या आजीच्या बटव्यात अशा अनेक गोष्टी आहेत ज्या डार्क सर्कल्सवर अत्यंत प्रभावी ठरतात. डार्क सर्कल  घालवण्यासाठी आपण ज्येष्ठमधाचा वापर करू शकतो. याची पावडर पाण्यात विरघळून डार्क सर्कल असणाऱया ठिकाणी लावा. बदामाच्या तेलाचादेखील उपयोग करू शकतो.

पिग्मेंटेशन आणि कोलेजनच्या समस्या टाळायच्या असतील तर गुलाबच्या तेलाचा वापर करू शकतो. हे तेल त्वचेला नैसर्गिक चमक देते. या उपायांसोबतच पुरेशी झोप, भरपूर पाणी प्या आणि संतुलित आहारही तितकाच महत्त्वाचा आहे. स्क्रीन टाइम कमी केला आणि फळ-भाज्यांचा समावेश केला तर डोळय़ांखालची काळी वर्तुळे लवकर आटोक्यात येतात.