
मुलांना खूप आवडणाऱया चटपटीत कैरीच्या गोळ्या म्हणजेच आम पाचक किंवा गटागट घरीच बनवणे अगदी सोपे आहे.
सर्वप्रथम एक ताजा, कडक आणि आंबट चवीचा कच्चा आंबा निवडा. स्वच्छ धुऊन कुकर किंवा स्टीमरमध्ये वाफवून घ्या.
थंड झाल्यावर साल काढून मऊ गर वेगळा करा. त्यात काळं मीठ, भाजलेलं जिरं पावडर, काळी मिरी, गरम मसाला, आमचूर पावडर आणि साधं मीठ घाला.
सर्व मसाले मिसळल्यानंतर गॅस बंद करा. मिश्रण कोमट असताना हाताला थोडं तूप लावून छोटे-छोटे गोळे तयार करा.




























































