
पंख्याच्या आवाजाची अनेक कारणे आहेत. सामान्य कारणे म्हणजे सैल स्क्रू, वाकलेले ब्लेड किंवा मोटर घर्षण. धूळ साचणे आणि दीर्घकाळ साफसफाईचा अभाव यामुळेदेखील पंख्याचा आवाज येतो. तसेच बॅलन्स बिघडून खडखड आवाज होतो.
प्रथम सर्व फिटिंग्ज तपासा. हलके स्क्रू घट्ट करा. धूळ-घाण जमा झाल्याने पंख्याची ब्लेड खराब होतात. ब्लेडला कोरडय़ा किंवा हलक्या ओल्या कपडय़ाने स्वच्छ करा. मोटरमध्ये ऑयलिंगची आवश्यकता आहे का बघा. टेक्निशियनची मदत घ्या.





























































