हे करून पहा – कपाटात कपड्यांचा पसारा झाला…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बऱ्याचदा कपाटात कपडे वेळेवर सापडत नाही. कपाटातून कपडे खाली पडतात. अशा वेळी कपाट आवरताना काही टीप्स लक्षात घ्याव्यात. कपाटाच्या कप्प्यात कपड्यांचे नीट वर्गीकरण करा. एका कप्प्यात जीन्स किंवा दुसर्यात कुर्ते आणि लेगिन्स ठेवा.

आतल्या कपड्यांसाठी वेगळी जागा ठेवा. पेहरावाचे सेट करा. साडीवरील ब्लाऊज-परकर तसेच कुर्ता-लेगिन्सचा सेट करा. धुवायचे, इस्त्राrचे कपडे वेगळे ठेवा. आठवडय़ाचे कपडे आधीच धुऊन व्यवस्थित इस्त्री करून रविवारी बाजूला काढा.