
आजकालची मुलं बाहेर खेळण्याऐवजी तासंतास स्मार्टपह्न, टॅब्लेट आणि इंटरनेटवर वेळ घालवतात. त्याचा परिणाम मुलांच्या शारीरिक आणि मानसिक विकासावर होतो.
मुलांची गेमिंगची सवय कमी करता येईल. मुलांना अचानक गेम खेळण्यापासून थांबवणे किंवा फटकारणे योग्य नाही. मुले आणखी हट्टी होण्याची शक्यता असते.
गेमिंगमुळे डोळे खराब होऊ शकतात आणि इतर त्रास होऊ शकतो, हे मुलांना प्रेमाने समजावून सांगा. दररोज अर्धा ते एक तास गेम खेळण्याची वेळ ठरवा.
आठवडय़ात 1-2 स्क्रीन-फ्री दिवस ठेवा. मुले गेममध्ये हरवतात. कारण त्यांना एकटेपणा वाटतो. रोज त्यांच्यासोबत वेळ घालवा, खेळ खेळा, त्यांना फिरायला न्या.
मुलांना सर्जनशील ऑक्टिव्हिटीमध्ये गुंतवा. उदाहरणार्थ – चित्रकला, संगीत, नृत्य, स्वयंपाक किंवा क्विझ आणि स्पर्धा. त्यामुळे गेमिंग व्यसन कमी होईल.




























































