
आखातात भडकलेलं युद्ध आणि वाढता तणाव लक्षात घेत मोदी सरकारने सावध भूमिका घेत हिंदुस्थानी नागरिकांना आखाती देशांचे हवाई क्षेत्र टाळून प्रवास करण्याची सूचना केली आहे. अमेरिका-इस्रायल आणि इराणकडून हल्ले-प्रतिहल्ले सुरू आहेत. या हल्ल्यांमध्ये प्रवाशी विमाने लक्ष्य होऊ शकतात. त्यामुळेच आखातातील इराण, इस्रायल, लेबनॉन, सौदी अरेबिया, बहरीन, ओमान, इराक, जॉर्डन, संयुक्त अरब अमिराती, कतार, कुवेत या 11 देशांचे हवाई क्षेत्र ‘हायरिस्क’ म्हणून घोषित करत डीजीसीएने हिंदुस्थानी प्रवाशांना सावध केले आहे.

























































