
ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर यांच्या निधनामुळे त्यांच्या संघर्षमय वाटचालीच्या आठवणी जाग्या झाल्या आहेत. उमेदीच्या काळात मुंबईत स्मशानात राहून दिवस काढावे लागलेल्या गवाणकर यांनी आपल्या प्रतिभेच्या जोरावर नाटय़रूपी प्रतिसृष्टी निर्माण केली. त्यांचा हा प्रवास सर्वांसाठीच प्रेरणादायी ठरला आहे.
गवाणकर हे ‘वस्त्रहरण’ या नाटकामुळे ओळखले जात असले तरी त्यांची प्रतिभा तितकीच मर्यादित नव्हती. ’वस्त्रहरण’नंतर त्यांनी लिहिलेल्या एकापेक्षा एक नाटकांनी ते सिद्ध करून दाखवले. ‘वात्रट मेले’, ‘वन रूम किचन’, ’वरपरीक्षा’, ’उषःकाल होता होता’, ’चित्रांगदा’ आणि दोघी अशी विविध आशय-विषयांची नाटके त्यांनी लिहिली. ’वात्रट मेले’ या नाटकाचे अडीच हजारांच्या आसपास प्रयोग झाले. तर, ’वन रून किचन’नेही नाटय़रसिकांना रंगभूमीकडे खेचून आणले. या नाटकाचेही हजारच्या वर प्रयोग झाले.
’दोघी’ हे काळाच्या पुढचा विचार करून लिहिलेले सर्वांगसुंदर नाटक समीक्षकांच्या प्रशंसेस पात्र ठरले. कमलाकर सारंग यांनी दिग्दर्शित केलेल्या या नाटकात लालन सारंग यांची भूमिका होती. गवाणकर यांच्या नाटकातून सखाराम भावे, लीलाधर कांबळी, गिरीश ओक, शपुंतला नरे, जयंत सावरकर, सयाजी शिंदे, पंकज विष्णू अशा अनेक कलाकारांनी भूमिका केल्या होत्या.
गवाणकर साहेबांचं तिसरं खूप गाजलेलं नाटक ‘वन रूम किचन’. मोहन तोंडवलकर यांच्या कलावैभव निर्मित आणि विनय आपटे दिग्दर्शित या नाटकात डॉक्टर गिरीश ओक, शपुंतला नरे, जयंत सावरकर, सयाजी शिंदे यांच्या यात मध्यवर्ती भूमिका होत्या.
याव्यतिरिक्त गंगाराम गवाणकर यांची इतर नाटके जी माहीत आहेत त्यात वरपरीक्षा, उषःकाल होता होता आणि दोघी. दोघी हे त्या काळातलं काळाच्या पुढचा विचार करून लिहिलेलं असतं. एक फार सर्वांगसुंदर असं नाटक होतं. कमलाकर सारंग यांचे दिग्दर्शन आणि लालन सारंग यांची यात भूमिका होती.
मालवणी मुलुखातील प्रतिभावंत गमावला
कोकणातील माणसाचे भावविश्व, मालवणी बोलीच्या ठसक्याची जगाला ओळख करून देणाऱया गवाणकर यांच्या निधनाचे वृत्त दुःखदायक आहे. त्यांच्या निधनाने आम्ही मालवणी मुलुखातील एक प्रतिभावान लेखक गमावला, अशी भावना सांस्पृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार यांनी व्यक्त केली.
दुसरं अत्यंत लोकप्रिय आणि गाजलेलं नाटक वात्रट मेले. ज्याचे अडीच हजारांच्या आसपास प्रयोग झाले. रणजीत मसुरेकरची निर्मिती असलेल्या या नाटकात सखाराम भावे आणि लीलाधर कांबळी या दोन दिग्गज अभिनेतांच्या भूमिका होत्या.
गंगाराम गवाणकर यांचे निधन
वयपरत्वे थकलेले गवाणकर हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. मागच्या 15 दिवसांपासून दहिसर येथील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. तिथेच आज रात्री पावणे अकराच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिववार मंगळवारी सकाळी बोरिवली पूर्वेकडील दौलतनगर स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.






























































