मिले सूर मेरा तुम्हारा… दादरमध्ये आंतरशालेय भारतीय समूहगान स्पर्धा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईतील नामांकित शिक्षण संस्थांपैकी अग्रगण्य असलेल्या इंडियन एज्युकेशन सोसायटी-ओरायन (आयसीएसई) शाळेतर्फे ‘मिले सूर मेरा तुम्हारा’ या आंतरशालेय समूहगान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा 24 एप्रिल रोजी दादर हिंदू कॉलनी येथील प्राचार्य बी. एन. वैद्य सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे यंदा दुसरे वर्ष आहे.

महाराष्ट्रातील विविध आयसीएसई मान्यताप्राप्त शाळांसाठी आयोजित या स्पर्धेत 35 हून अधिक शाळांचा सहभाग नोंदवला आहे. मुंबई, तळेगाव, पुणे, ठाणे आणि नाशिकसारख्या शहरांतील शाळा या स्पर्धेत सहभागी होत आहेत. या स्पर्धेचे विशेष आकर्षण म्हणजे प्रत्येक संघाला दहा मिनिटांच्या सादरीकरणात एक देशभक्तीपर गीत आणि एक लोकगीत सादर करायचे आहे. इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या ओरायन शाळेने ही स्पर्धा आयोजित करून हिंदुस्थानी संस्कृती, लोकसंगीत आणि एकतेचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा स्तुत्य प्रयत्न केला आहे. या उपक्रमासाठी शाळेचे विश्वस्थ, मुख्याध्यापिका स्मिता सुलाखे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण शाळा व्यवस्थापनाने मेहनत घेतली आहे.