
इंग्लिश फलंदाज केव्हिन पीटरसनने आयपीएलच्या पहिल्या फेरीतल्या सामन्यांनंतर थेट प्ले ऑफचा हिशेब मांडत खळबळ उडवली आहे. गतविजेता बंगळुरू रॉयल चॅलेंजर्स प्ले ऑफचे दिव्य गाठू शकणार नाही तर चेन्नईच्या सुपर किंग्सना यंदाही सुरू गवसणार नसल्याचे सांगत सध्याच्या फॉर्मनुसार मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स, राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्स हे चार संघ प्ले ऑफमध्ये आमने-सामने येऊ शकतात. मात्र अचानक होणाऱया दुखापती हा सगळा खेळ उलथवू शकतात, असा इशाराही पीटरसनने दिला आहे.
नेहमीच आयपीएलच्या प्रेमात असलेल्या पीटरसनने सोशल मीडियावर आपल्या अंदाजाचे तारे तोडत आताच्या घडीला माझा अंदाज मुंबई, राजस्थान, दिल्ली आणि पंजाब या चार संघांवर आहे. पण दुखापती झाल्या तर चित्र बदलू शकते. त्याच्या यादीतून सर्वात मोठे नाव असलेले गतविजेते रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू साखळीतच बाद होत आहेत. आरसीबी संघात मधल्या फळीतली अस्थिरता, फिरकी आघाडीची कमकुवतता आणि हेझलवूडची फिटनेस ही मोठी चिंता आहे. जेतेपद हे गोलंदाजच जिंकून देतात, असा त्याचा सूर होता.



























































